दि. 29 सप्टेंबर रोजी लमांजन , जळगाव ग्रामीण येथील लमांजन ते शिर्डी साईबाबा पालखी सोहळा .. आज प्रस्थान झाले असून, या सोहळ्यास बी आर एस पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा यांनी भेट दिली.
यावेळी भगवान धनगर, ईश्वर कोळी, इस्माईल भाई, सर्व साई पालखी सोहळा समिती चे आयोजक , श्री साई भक्त परिवार ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
यावेळी लकी अण्णा यांनी श्री साई पालखी सोहळा मध्ये सहभागी होत. साईबाबांचे पालखी पूजन केले. पालखी खांद्यावर घेत. टाळ हातात घेत. पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी आयोजकांनी रुमाल टोपी देवून अण्णा यांचा सत्कार केला. लकी अण्णा यानी पदयात्री बांधवाना वाटचालीस शुभेच्छा दिल्या.