याबाबत माहीती अशी की आरोग्य विभागात नोकरीसाठी एप्लीकेशन करणारा मुलगा विशाल गजानन चव्हाण राहणार वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव (खांदेश) याची कंपनी कडून ९०० रुपयांची फसवणूक झाली आहे व फार्म ही भरला गेला नाही
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भरपूर मुलांचे आरोग्य विभागाचे आज दिनांक 22/9/2023रोजी रात्री 11वाजे पर्यंन्तची शेवटची वेळ आणि तारीख असल्यामुळे बऱ्याच मुलांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत
परंतु त्यांचे फॉर्म भरले असता ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागते.
*परंतु ऑनलाईन पेमेंट केल्यावर विशाल गजानन चव्हाण यांनी 900 रुपये ऑनलाईन भरल्यानंतर सुद्धाबँक अकाउंट मधून 900 रुपये कपात झाले परंतु तिकडं ऑनलाईन फॉर्म च्या स्क्रीनवर पेमेंट फेल असे मेसेज आले बऱ्याच मुलांचे असे 900 रुपये गहाळ झाले आहेत
त्या मुळे विशाल गजानन चव्हाण यांनी आरोग्य मंत्री मा,श्री तानाजी सावंत साहेबांना तक्रारी साठी फोन केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही
मग थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शी संपर्क साधला असता मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी बोलणे झाले असता सचिव साहेबांनी TCS कंपनी सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही
परंतु C.M. साहेबांच्या सचिवांनी मी कंपनी सोबत बोलतो असे आश्वासन दिले आहे .
पण मुलांचे पैसे पण गेले आणी आरोग्य विभागाची परिक्षा पण गेली याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे
तरी या कंपनीवर सरकार कारवाई करेल का व गेलेले पैसे व परिक्षेपासुन वंचित राहणाऱ्या मुलाबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे