Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे पर्यावरण जागर प्रतिष्ठान तर्फे हिरानगर परिसरात वृक्षारोपण

पर्यावरण जागर प्रतिष्ठान व
हरित शहर स्वच्छ शहर च्या वतीने हरितालिकेच्या पूर्वसंध्येला वृक्षारोपण करण्यात आले

भुसावळ येथील पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र व हरित शहर स्वच्छ शहर भुसावळ शहर च्या संकल्पनेनुसार दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर या दोन दिवसात जामनेर रोडवरील महालक्ष्मी हार्डवेअर पासून ते महादेव मंदिर दिगंबरनगर ते हिरानगर परिसर या परिसरात कॉलनीतील रस्त्यांच्या एका बाजूने परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने त्रि गार्डसह वृक्षारोपण करण्यात आले . 
या परिसरातील नागरिकांना सुरुवातीला पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक संचालक सुरेंद्र सिंग पाटील व कार्याध्यक्ष तथा हरित शहर स्वच्छ शहर संकल्पना राबविणारे नाना पाटील सर यांनी परिसरातील नागरिकांना वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी आपण घेणार असाल तर आपल्या परिसरात वृक्षारोपणनासह ट्री गार्ड ही लावून देणार असल्याचे सांगितल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला सहकार्य करून संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली यामुळे त्या परिसरात 55 वृक्ष ट्री गार्डसह दोन दिवसात लावण्यात आले .
महादेव मंदिराच्या परिसरात शमीचे व बेलाचे वृक्ष ही लावण्यात आली आहेत परिसरात मात्र लिंबाचे व शीसमचे वृक्ष लावण्यात आले आहेत . या उपोषणाच्या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन सहकार्य केले . नागरिकांनी केलेल्या सहकार्य व खऱ्या अर्थाने पाच मजुरांनी ही या कार्यासाठी दोन दिवस सहकार्य केले .याबद्दल पर्यावरण जागर प्रतिष्ठान च्या वतीने नाना पाटील व सुरेंद्र सिंग पाटील यांनी आभार मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.