नगरपरिषदेचे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील यांनी दिली वृक्ष प्रतिज्ञा
भुसावळ येथील सेंट अलायन्स शाळेला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने शाळेतील पर्यावरण प्रेमी शिक्षिका व नेचर क्लब च्या संस्थापिका श्रीमती रेखा चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सहकाऱ्यांने नेचर क्लब ची स्थापना करून शाळेला होत असलेल्या दीडशे वर्ष यानिमित्ताने दीडशे झाडे लावण्याचा उपक्रम त्यांनी आयोजित केला या कार्यक्रमाला पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष हरित शहर स्वच्छ शहर भुसावळ शहर संकल्पना राबविणारे नाना पाटील सर यांनी नेचर क्लबच्या विद्यार्थ्यांना वृक्षांचे जीवनातील महत्त्व सांगून वृक्षाची प्रतिज्ञा दिली त्यानंतर विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढून शाळेच्या परिसरातील आवारात वृक्षारोपण केले या कार्यक्रमाला महान्यूज चॅनेल चे व वन्यजीव संस्थेचे सतीश कांबळे पर्यावरण प्रेमी व वेदांत नर्सरीचे संचालक संजीव पाटील सर उपस्थित होते
.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती रेखा चौधरी यांनी केले .या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलमा यांनीही विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाबद्दल मार्गदर्शन केले पर्यवेक्षिका सिस्टर शोभना सागर कुलकर्णी मिस सिंथा तसेच नेचर क्लबचे दीडशे विद्यार्थी उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .या कार्यक्रमासाठी श्रीमती रेखा चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला