सार्वजनिक बुद्ध विहार आयुध निर्माणी वरणगाव येथे २५व्या वर्षावास मालिकेत श्रावण पौर्णिमा निम्मित पूज्यभंतेजी ह्यांच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ आयोजित करण्यात आला होता.
सर्वप्रथम पूज्यभंतेजी च्या हस्ते बोधिवृक्ष पूजा यानंतर पंचशील ध्वजारोहण, त्यानंतर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण मानवंदना देऊन भन्ते सुमंगलबोधी महास्थवीर यांच्या कडून अष्टशील बुद्ध वंदना भीमस्मरण भिम स्तुती महापरित्राण पाठ घेण्यात आला .
तथागत भगवान गौतम
बुध्दानी सांगितलेल्या मानवी जीवन जगण्याची प्रज्ञा, शिल, करुणा मैत्री यांच्या विचारावं जीवन जगावे असा उपदेश दिला आला.ह्या मुळे धम्ममय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अरुणाताई इंगळे यांनी केले या वेळी बहुसंख्य श्रद्धावान उपासक उपासिका उपस्थित होते.
धम्म प्रवचन मंगल मैत्री सरनतय होऊन कार्यक्रम संप्पन झाला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांनी केले .
या कार्यक्रमासाठी आयु.अरुणाताई गुरचळ,आयु.पद्माताई सुरवाडे, आयु.अंजनीताई भालेराव, आयु.शिलांबरीताई जमदाळे,आयु.सुनंदाताई इंगळे आयु.ज्योत्स्नाताई तायडे,सुलोचनाताई लोखंडे ,पाणकोरबाई वानखेडे गयाबाई सोनवणे, उषाताई सोनवणे मोनालीताई मेढे, उज्वलाताई इंगळे,अलकाताई चिकणे, कपिलाताई गवळी,कोमलताई तायडे,प्रकाश इंगळे,विलास चिकणे,संजय मेढे, जे डी तायडे,राज गुरचळ, संजय भालेराव,एस.आर.डोंगरे साहेब , तेजस जमदाळे, पी. जी.सोनवणे सर,या कमिटीचे सचिव आर.जे.सुरवाडे, कोषध्यक्ष जितेंद्र केदारे,ज्ञानेश्वर वानखेडे,विनोद शिरसाठ,जे.डी.तायडे, प्रकाश इंगळे,नितीन तायडे,यांनी परिश्रम घेतले अध्यक्ष चंद्रकांत गवळी यांनी कळवले आहे.