भुसावळ उपविभागीय पोलीस विभाग अंतर्गत एक अधिकारी व चार पोलीस कर्मचाऱ्यांना एम्प्लोई ऑफ मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
भुसावळ विभागाचे डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे यांनी सदर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे . याप्रसंगी परि . पोलिस उपअधिक्षक सतिष कुलकर्णी , पोलिस निरीक्षक गजानन पडघन , बबन आव्हाड , रामेश्वर मोताळे , व वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरिक्षक प्रमोद लोणे यांच्या सह ६० दुय्यम अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .
सन्मानार्थी मध्ये भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे स . फौ . अनिल चौधरी , भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोहेकॉ रशीद तडवी , बाजार पेठ पोलीस स्टेशनचे पो कॉ उमाकांत पाटील , नशिराबाद स्टेशनच्या महीला पो.कॉ लीना नारखेडे , तसेच भुसावळ वाहतूक विभागाचे पी .एस .आय प्रमोद लोणे यांना गौरविण्यात आले आहे
महीना भरात केलेल्या उत्कृष्ठ कार्याच्या अनुषंगाने सदर कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले आहे तसेच याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर करूनच हा सन्मान करण्यात आला आहे .