Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मुक्ताईनगर येथे खा . रक्षाताई खडसे यांनी घेतली केंद्र शासन पुरस्कृत योजनांची आढावा बैठक

*मुक्ताईनगर येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत, केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांची आढावा बैठक संपन्न.

*मुक्ताईनगर तहसिल कार्यालय* येथे *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्या प्रमुख उपस्थितीत *केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांची आढावा बैठक* आज आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, तसेच राज्य सरकार पुरस्कृत आवास योजना व इतर योजनांचा आढावा घेण्यात येऊन संबंधित कर्मचाऱ्यांना योग्यता सूचना *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी यावेळी दिल्या.

यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह *मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक प्रमुख श्री.अशोक कांडेलकर*, जिल्हा उपाध्यक्ष श्री.डी.एस.चव्हाण सर, श्री.संतोष खोरखेडे, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.ललित महाजन, नगराध्यक्षा सौ.नजमा तडवी, तालुकाध्यक्ष श्री.प्रफुल्ल जवरे, तालुका सरचिटणीस श्री.चंद्रकांत भोलाणे, श्री.विनोद पाटील, शहराध्यक्ष श्री.पंकज कोळी, माजी पं.स.सदस्य श्री.राजेंद्र सवळे, श्री.गुणवंत पिवटे, श्री.निखिल भोलाणकर, श्री.संतोष झनके, वढोदा सरपंच सौ.स्वप्ना खिरोळकर, गटविकास अधिकारी सौ.जाधव, पं.स.विस्तार अधिकारी श्री.अडगळे तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील संबधित योजनांचे शासकीय व निमशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.