*देशा विरुद्ध कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही करण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांचे आश्वासन
फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कट्टर शिवसैनीक आदरणीय उद्धव ठाकरे साहेब गट तथा सेवा निवृत्त सहाय्यक फौजदार व महाराष्ट्र चॅम्पियन , देशभक्त पहेलवान शकील शेख यांनी भारत देशाविरुद्ध कृत्य करणाऱ्या व षडयंत्र रचणाऱ्या व स्वातंत्र्यास बाधा आणणाऱ्या तसेच देशद्रोही कट-कारस्थान रचणाऱ्या नंदुरबार येथील सराईत व हद्द पार गुन्हेगार नायब कुरेशी कसाई व रावेर पोलीस ठाण्यात असलेला पोलीस जमादार जमील शेख उर्फ जमील पहेलवान राहणार भुसावळ यांचेवर देशाविरोधी कारवाह्या केल्या बाबत त्यांचेवर कार्यवाही करण्यासाठी या पूर्वीच गंभीर तक्रारी अर्ज दिले आहे , तसेच सदर तक्रारी अर्जात 14 ऑगस्ट पर्यंत चौकशी करून कार्यवाही न केल्यास 15 ऑगस्ट रोजी कुटूंबासह जिल्हाधिकारी जळगाव येथे आत्मदहन चा इशारा दिला असता व आत्मदहन साठी गेलो असता पोलिसांनी बळाचा वापर करून मेन गेट वरच आत्मदहन करू दिले नाही , पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली व मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला परंतु मीडिया वाले व TV चॅनेल वाले माझ्या जवळ लागलीच आले व माझी मुलाखत घेऊन निवेदन स्वीकारले आहे तसेच पोलिसांनी माझी अप्पर जिल्हाधिकारी जळगाव यांची भेट घालून दिली असून मा. अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी माझे म्हणणे पुर्ण ऐकून घेऊन व निवेदन पूर्ण वाचून स्वीकारुन देशद्रोही सारखे कृत्य करणाऱ्या वर कठोर कार्यवाही नायब कुरेशी कसाई व जमील पोलीस जमादार व त्यांचे इतर साथीदार यांच्यावर करण्याचे मला आश्वासन दिलेले आहे असे पत्र शकील पहेलवान यांनी प्रसिध्दीस दिले आहे .