Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जिल्हा परिषद नोकर भरती परिक्षेसाठी फि १०० रुपये ठेवावी शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील यांची मागणी


जिल्हा परिषद नोकर भरती मध्ये परिक्षा "फी" १०० रुपये करा........
संदीप पाटील, शेतकरी संघटना 

 राज्यात पावसाळी अधिवेशनात  विविध मुद्द्यांवर चर्चा पाहायला मिळाली दरम्यान राष्ट्रवादी चे आमदार रोहित पवार  यांनी  विधानसभेत स्पर्धा परिक्षा शुल्काच्या मुद्द्यावर चर्चा केली. सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा ठरला होता राज्यभरात नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. शासकिय नोकऱ्यांची भरती जरी आली तरी त्यासाठी 1000  किंवा त्याहून अधिक रुपयांची "फी" भरावी लागते असा मुद्दा मांडला होता महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. "क" गटाच्या भरती साठी १००० रुपये फि आकारणी केली जात आहे हे अत्यंत चुकीचे आहे अशी खंत शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील यांनी व्यक्त केली आहे 

स्पर्धा परीक्षांच्या शुल्काच्या (Competitive Examination Fees) माध्यमातून सरकार, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या कमाई करत असल्याची चर्चा सुरू असते. UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर विधानसभेत चर्चा करून काय उपयोग?? 


सोशल मीडियावर या विषयी चर्चा रंगली आहे. स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओवर चांगला प्रतिसाद दिला आहे. 25 जुलै रोजी रोहित पवारांनी याच मुद्द्यावर चर्चा केली होती. नुकतीच तलाठी पदासाठी अर्ज मागवण्यात आले होतं. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. महिन्याभरातंच शासनाकडे 12 लाख 77 हजार 100 अर्ज आले आहेत. ज्याची एकूण शुल्क रक्कम तब्बल 127 कोटी रुपये हे शासकीय खात्यात जमा झाले. असा अहवाल देखील  विधानसभेत मांडण्यात आला तसेच आता महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्यासाठी १००० रुपये प्रमाणे फी आकारली जात आहे सरकार खाजगी कंपनीला फायदा मिळवून देण्याचे काम करत आहे . रोहित पवार यांनी स्वतः लक्ष घालून जिल्हा परिषदेमध्ये नोकर भरती ची फी १०० करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील किरण गुजर सचिन शिंपी विनोद धनगर रविंद्र माळी अखिलेश पाटील खुशाल सोनवणे सय्यद देशमुख आदी पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.