Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे निवेदन

*बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तहसीदारांना शेतकरी संघटनेने निवेदन दिले आहे .
        भडगाव तालुक्यांतील वाडे बहाळ तसेच नावरे  शेतशिवारात मागील ६ महिण्या पासुन बिबट्याचा वावर आहे. 
त्या बिबट्याने आता पर्यंत ८ ते ९ वासरांचा फडशा पाडला असून शेतकऱ्यानं मध्ये भीतीचे वातावरण आहे. काल दि.१० रोजी वाडे गावातील शेतकरी प्रभाकर विठ्ठल पाटील यांच्याही शेतात तारेच कुंपण तोडून बिबट्याने वासरीचा फडशा पाडला आहे. अशीच घटना ८ दिवसांपूर्वी विकास नारायण पाटील यांच्या शेतात ही घडली होती.अशा घटना वारंवार  घडत असून वन विभाग काहीच करताना दिसत नाही. आधीच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत त्यात पशुधनाची अशी हानी होत असेल तर शेतकर्यांनी जगावं कस हा प्रश्न उभा राहतो. आज मुक्या जनावरांवर हल्ला होतोय उद्या उठून माणसांवर हल्ला झाला तर याला जबाबदार कोण असेल ??
वन विभागाने तत्काळ या घटनांची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा असे आदेश वनविभागाला द्यावे अन्यथा उपोषणाची परवानगी द्यावी,अशा मागणी संदर्भाच निवेदन शेतकरी संघटनेचे अखिलेश पाटील, अक्षय पाटील, भाऊसाहेब माळी, कुलदीप पाटील व आदी शेतकऱ्यानं कडून भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.