Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


दोन्ही सख्या बहीणी ची पोलीस पाटील पदी निवड

सख्या दोघी बहिणींनी पोलीस पाटील पदी विराजमान होण्याचा बहुमान मिळविला आहे .
 गरताड ता.चोपडा निवासी श्री.मच्छिंद्र पांडुरंग पाटील निवृत्त सैनिक , हल्ली नेमणूक वायरलेस पोलीस विभाग,जळगांव यांच्या जेष्ठ सुकन्या सौ.मिताली नरहर पाटील,निम ता.अमळनेर व लहान सुकन्या सौ.मोनिका घनश्याम पाटील,खेडीभोकरी ता.चोपडा ह्या स्वतःच्या गुणवत्तेने *पोलीस पाटील* पदी विराजमान झाल्या आहेत .
 गुजर समाजासाठी हि खूपच अभिमानाची बाब आहे.दोघी बहिणी उच्च शिक्षित आहेत. या यशात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारे निम कर श्री.नरहर धुडकू पाटील सर(माध्यमिक शिक्षक, शारदा माध्यमिक विद्यालय,कळमसरे) तसेच खेडीभोकरी कर श्री.घनश्याम डिगंबर पाटील सर,संचालक श्री.समर्थ मॅथ अकॅडमी,चोपडा यांचे पण खूपच योगदान आहे. गावाच्या सेवेसाठी पदप्राती केल्याबद्दल शनि देव त्यांच्या हातून समाजाची व गोरगरिबांची  उत्कृष्ट व आदर्श सेवा घडवून आणो हिच शनि देवा चरणी प्रार्थना .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.