Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


इनरव्हील रेल सिटी तर्फे पर्यावरण रक्षणा साठी कापडी पिशव्या वितरण संपन्न

ईनरव्हील रेलसिटी ने मोफत कापडी  पिशव्या वाटून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे .
     27 ऑगस्ट रोजी म्युनिसिपल हायस्कूल जवळ जामनेर रोड भुसावळ येथे ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने मोफत कापडी पिशव्या वाटप चा प्रोजेक्ट घेतला .
याकरिता क्लब सदस्यांनी आपल्या घरातील जुन्या साडयांचा पिशव्या बनवण्यासाठी वापर केला .जवळपास 1500 पिशव्या शिवून त्यांचे वाटप आज रविवार आठवडे बाजाराच्या दिवशी त्यांचे सकाळी 9:30 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व नागरिकांना मोफत वाटप केल्या
 .यातून क्लबने प्लास्टिक पिशव्या ,कॅरीबॅग टाळा आणि पर्यावरण वाचवा हा संदेश दिला .परिसरातील व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी या उपक्रमाची स्तुती केली .अशे उपक्रम नेहमी व्हायला हवे यासाठी विविध संस्थांनी पुढे यायला पाहिजे असे मत उद्घाटन प्रसंगी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनीताई सावकारे यांनी व्यक्त केले .पुढील वर्षी हा उपक्रम आमचा क्लब आणखी जोमाने करेल अशा निर्धार  प्रोजेक्ट चेअरमन सौ.सुनीता पाचपांडे यांनी बोलून दाखवला आहे .
या प्रोजेक्ट साठी अध्यक्षा सौ रेवती मांडे ,सचिव सौ सीमा सोनार ,प्रोजेक्ट चेअरमन सौ सुनीता पाचपांडे व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.