Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


आईच्या स्मृती प्रित्यर्थ भुसावळचे माजी उपनगराध्यक मुन्ना इब्राहीम तेली यांनी केले वृक्षारोपण

मातोश्री रहमत बी इब्राहिम तेली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माजी उपनगराध्यक्ष मुन्ना तेली परिवाराने वृक्ष लावुन अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे .
हिंदू मुस्लिम एकता मंच व पर्यावरण जागर प्रतिष्ठान चा हा स्तुत्य उपक्रम आहे .
भुसावळ येथील आपल्या आईच्या स्मृती कायम लक्षात राहाव्यात आई म्हणजे मायेची सावली असते ती कायम सावली देत असते .पण आई गेल्यानंतर तिच्या सावली रूपी आठवणी कायम राहाव्यात म्हणून आईच्या स्मृती पित्तर्थ माजी उपनगराध्यक्ष मुन्नाभाई तेली इस्माईल भाई तेली  अकील भाई तेली या तेली परिवाराने वृक्ष लावून ते जतन आणि संवर्धन करूनआईच्या स्मृती कायम जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला .यावेळी हिंदू मुस्लिम एकता मंचचे अध्यक्ष साबीर मेंबर हरित शहर स्वच्छ शहर भुसावळ शहर तथा नगरपरिषद भुसावळ चे ब्रँड अँबेसेडर नाना पाटील यांनी तेली परिवाराने आईच्या स्मृतिपित्तर्थ वृक्ष लावून स्मृतींचे जतन केले एक नवा उपक्रम मुस्लिम समाजामध्ये त्यांनी निर्माण केला हिंदू मुस्लिम एकता मंच च्या माध्यमातून व हरित शहर स्वच्छ शहर भुसावळच्या माध्यमातून हा नवीन संदेश जनतेला जाईल आणि याचे अनुकरण समाजातील प्रत्येक घटक करतील अशी आशा व्यक्त करून नाना पाटील सर यांनी केली परिवाराचे आभार मानले शाबीर मेंबर यांनीही हिंदू मुस्लिम एकता म्हणजे एक चांगलं उदाहरण या उपक्रमातून दिले .मुन्नाभाई तेली यांनी सुद्धा समाजाला आव्हान केले कोणत्याही प्रसंगी वृक्ष लावून ते संवर्धन करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला तर भुसावळ निश्चितच हरित शहर बनल्याशिवाय राहणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करने गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले .यावेळी माजी नगराध्यक्ष
अख्तर भाई पिंजारी श्री टॅटू सेट श्री तानाजी पाटील श्री अनिल महाजन पप्पू सेठ जमील भाई रफासेट खंडवा इकबाल बागवान हिंदू मुस्लिम एकता मंच चे अध्यक्ष साबीर भाई मेंबर श्री शिरसाट साहब पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.