साकळी ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दि.१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन प्रशासक अधिकारी के.सी. सपकाळे तसेच ग्रामविकास अधिकारी हेमंत के.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार दिनाचे औचित्य साधून कर्मचार्याच्याच हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण चुडामण तेली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर कर्मचारी लीलाधर मोरे व माजी वरिष्ठ लिपीक पंढरीनाथ माळी यांच्या हस्ते ध्वजपूजन व नारळ वाढवणेत आले.तद्नंतर राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले.याप्रसंगी साकळीचे मंडळ अधिकारी एस.टी.जगताप साहेब, तलाठी व्ही.एस.वानखेडे, माजी ग्रा.पं.सदस्य दिनकर माळी, दिपक पाटील , शरद बिराडे नूतन विकासोचे संचालक ईश्वर कोळी,पीक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन पांडुरंग निळे, जि.प.मराठी मुलांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौरभ जैन (सर ),सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण खेवलकर, मधुकर तेली माजी होमगार्ड सुभाष बाविस्कर, तेली समाज पंच अशोक चौधरी नितीन फन्नाटे, सामाजीक कार्यकर्ते विलास पवार,होमगार्ड रणछोड कुंभार,
अंगणवाडी कर्मचारी उज्वला जंजाळे यांचे सह गावातील इतर नागरिक त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक विजय बाविस्कर, आरोग्य कर्मचारी
भागवत बिराडे,पिंटू पवार,जीवन कंडारे, मंजूबाई कंडारे हे उपस्थित होते. साकळीच्या इतिहासात प्रथमच् एखादया कर्मचाऱ्यांस ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार चंद्रकांत नेवे यांनी केले.