Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगाव येथे तिरंगा सर्कल जवळ महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न



भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे तिरंगा चौकात एक मे महाराष्ट्र दिनी तिरंगा ध्वज फडकविण्यात आला आहे .
 एक मे महाराष्ट्र दिन हा कामगार दिन म्हणून ओळखला जातो म्हणून भाजीपाला व्यापारी दगडू माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे . यावेळी राष्ट्रगीत झाले व देशभक्तीपर गीताने वातावरण आनंददायी झाले होते यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की दररोज सकाळी आठ वाजता या तिरंगा चौकामध्ये दररोज सकाळी आठ वाजता राष्ट्रगान होणार आहे . राष्ट्रगान सुरू झाल्यानंतर सर्वांनी दोन मिनिटांसाठी उभे राहून ध्वजाला सलामी द्यायची आहे . आपण 26 जानेवारीला एकशे पाच फुटाचा तिरंगा ध्वज फडकवला होता तर आज एक मे ला आपण नवीन प्रथा हे सुरू केली आहे दररोज या ठिकाणी सकाळी आठ वाजता सायरन वाजल्यानंतर दोन मिनिटांसाठी उभे राहून ध्वजाला सर्वांनी सलामी द्यायची आहे संध्याकाळी सहा वाजता देशभक्तीपर गीत या ठिकाणी लागणार आहे आपल्या देशाची आन-बान शान तिरंगा आहे असे यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आवाहन केले आहे पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील , माजी नगरसेवक मालाताई मेढे /माजी नगराध्यक्ष सुनील काळे . सुनील माळी , शामराव धनगर , मिलिंद भैसे  व असंख्य वरणगाव शहरातील नागरिकांची उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.