राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष 2023 निमित्त एस.एम.जोशी सोशालिस्ट फाउंडेशन आयोजित सामाजिक न्याय व सलोखा परिषद पाचोरा येथे आज दिनांक 1 मे 2023 महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त आयोजित करण्यात आली होती .
हा कार्यक्रम श्री गो .से. हायस्कूल पाचोरा ,जिल्हा. जळगाव. येथे भव्य परिषदेमध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवरांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जनार्दन चौधरी भुसावळ यांना राज्यस्तरीय सामाजिक न्याय व सलोखा सामाजिक कार्याबाबत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी माजी मंत्री हुसेनभाई दलवाई
(मौलाना अब्दुल कलाम आझाद विचारमंच, महाराष्ट्र)मा.मेधाताई पाटकर(पर्यावरणवादी कार्यकर्त्या ,साथी सुभाष लोमटे विश्वस्त सचिव, एस एम जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन/महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ महाराष्ट्र)प्रा.गणपत धुमाळे मणियार लाॅ कॉलेज जळगाव , प्रतिभाताई शिंदे लोकसंघर्ष मोर्चा, महाराष्ट्र 'वाहरूभाऊ सोनवणे ,आदीवासी कवी विचारक,आदीवासी एकता परिषद ,इंजी.अविनाश पाटील अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र शेखर सोनाळकर
आदि मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमात खान्देशातील १० सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजकार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी खलील वेशमुख ,
जय वाघ ,आनंद नवगिरे,प्राचार्य डॉ.बी.एन. पाटील,प्रा.डॉ.वासुदेव वले,सुनिल शिंदे, धनराज(डि.एन) पाटील ,प्रा.प्रदिप पाटील, ॲड अनिल पाटील, प्रविण ब्राह्मणे,ॲड कैलास सोनवणे, फिरोज खान, इम्रान सर, विकास पाटील सर,ए.बी.अहिरे, रणजित पाटील, अजहर खान,ॲड.अविनाश भालेराव,देविदास पाटील, आर एल पाटील, मनिष बाविस्कर,किशोर डोंगरे,संगिता साळुंखे, पप्पु राजपुत, विश्वनाथ भिवसने,दीपक शेजवळ,अनिल लोंढे,प्रा वैशाली बोरकर,आर पी बागुल, भैय्या सावळे, राजरत्न पानपाटील,किशन सुर्यवंशी, प्रदीप जाधव,प्रा इंगळे,प्रा दीपक ब्राह्मणे,प्रा बंटी महाजन,एन आर ठाकरे आदींनी परिश्रम घेतले .