Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथील स्वामी समर्थ केन्द्रात भव्य रक्तदान शिबिर संपन्न



भुसावळ  येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ( दिंडोरी प्रणित ) नंदनवन कॉलनी केंद्र  भुसावळ येथे श्री जनसेवा अभियान अंतर्गत १ मे महाराष्ट्र दिन व २ मे सद्गुरु मोरेदादा पुण्यतिथीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले.
शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री दीपक भाऊ धांडे,डॉ उज्वला भंगाळे,डॉ वैशाली लोमटे. डॉ.कुणाल देवरे.( रक्त संक्रमण अधिकारी , ब्लड सेंटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय जळगाव),डॉ.शामली नावडे (सहाय्यक रक्त संक्रमण अधिकारी जळगाव) तसेच सहकर्मचारी सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर शिबिरात दिवसभरात भुसावळ शहर व ग्रामीण भागातून 48 रक्तदातांनी रक्तदानाची सेवा रुजू केली. तसेच शिबिर काळात आलेले सेवेकरी रक्तदातांना सेवा मार्गातील अठरा ग्राम अभियान तसेच जनकल्याण योजनेच्या स्टॉल लावून त्याचे महत्त्व समजून नवीन सभासद नोंदणी करण्यात आली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी भुसावळ तालुका केंद्राचे शहरी व ग्रामीण भागातील सेवेकर्‍यांनी परिश्रम घेऊन सेवा रुजू केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.