राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष यांनी अध्यक्षपद सोडल्याचा निर्णय हा अनपेक्षित असुन त्यांनी याबाबत फेरविचार करावा अशी अपेक्षा वरणगांव सह परिसरात वर्तविली जात आहे . वरणगांव परिसरातील राष्ट्रवादी पदाधिकारी . व कार्यकर्त्यांच्या बोलक्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या त्या पुढील प्रमाणे आहे .
राजेंद्र चौधरी ,जिल्हा उपाध्यक्ष रा. वरणगांव : साहेब गेल्या २७ वर्षापासुन एकनिष्ठ राहुन स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या माझ्यासारख्या एका सर्वसामान्य पान टपरी चालक असलेल्या माझ्या सारख्या साधारण कार्यकर्त्याला आपल्या कडून घेतलेल्या प्रेरणेमुळे समाजाची सेवा करण्याचे बळ मिळाले आज आपण घेतलेल्या "निवृत्तीच्या" निर्णयाने पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या समोर भिक मागतो आपण घेतलेला निर्णय मागे घ्या साहेब अजुन बरेच स्वप्न पुर्ण करायचे आहेत अजुन अनेक शिखरे सर करायची आहेत साहेब निर्णय मागे घ्या .
दिपक मराठे भुसावळ तालुका अध्यक्ष . वरणगांव
आदरणीय साहेब आपणास विनंती आहे आपण पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्तीचा घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा आपण निर्णय मागे घ्यावा देशाला महाराष्ट्राला आणि आम्हाला आपली गरज आहे आपण आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आहात मी भुसावळ तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आपणास विनंती करतो आपण निर्णयाचा फेरविचार करावा .
सौ प्रतिभा तावडे जिल्हा महीला उपाध्यक्ष वरणगांव. :
साहेब आप्ल्या निवृत्तीची घोषणा ऐकुन आधी धक्काच बसला आणी डोळ्यांनी अश्रुंना कधी वाट मोकळी केली ते समजलेच नाही😭थोरले साहेब आपला निर्णय परत फिरवा ....परत फिरवा साहेब आपला निर्णय परत फिरवा😞पदर पसरून आम्हिं आप्ल्या कडे दान मागतो ते आप्ल्या नेतृत्वाच दान आमच्या पदरात टाका साहेब ...आम्हाला काही नको साहेब आम्हाला फक्त पवार साहेब पाहिजेत.....साहेब आपली गरज फक्त राष्ट्रवादी पक्षालाच आहे अस नसुन संपुर्ण महाराष्ट्रालातर आहेच आहे पन देशाला देखील आपली गरज आहे साहेब🙏🙏🙏मी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील सह्याद्रीकडे बघते तेव्हा तेव्हा मला पवार साहेब दृढनिश्चयी अटल , तपस्वी वाटतात....मी जेव्हा जेव्हा सागराबद्दल ऐकते तेव्हा तेव्हा मला साहेब पोटात खूप काही दडवुन ठेवणारे आणी वरुन खूप शांत आणी संयमी वाटतात...परंतू सागरासारखे खवळले तर राजकारणात मोठी मोठी त्सुनामी देखील आणतात...मी जेव्हा जेव्हा शेतीचा विचार करते तेव्हा तेव्हा मला साहेबांचे कृषी धोरण आठवतात ....मी जेव्हा जेव्हा मुलाच्या नौकरीचा विचार करते तेव्हा तेव्हा मला हिंजवडी मधिल IT पार्क आठवतो की जिथे साहेबांच्या IT धोरणांमुळे हजारो मुल काम करताय....मी जेव्हा जेव्हा महिलांचा विचार करते तेव्हा तेव्हा मला साहेबांचे महिला धोरण आठवते,साहेबांचे महिलासाठि चे निर्णय आठवतात.....साहेब मी कस विसरु की माझ्या सारखी सर्वसाधारण महिला पक्षाच्या जबाबदार पदावर आज काम करतेय ...ग्रामपंचायत पासुन तर मंत्रालयापर्यंत सहजपणे वावरु शकते तिथे प्रश्न मांडू शकते अधिकारयाना जाब विचारु शक्ते हे फक्त आणी फक्त तुम्च्या तालमित तयार झाल्यामुळे साहेब...जेव्हा राष्ट्रवादी पक्षाला जवळचे लोक सोडून जात होते त्यावेलेस आपण 80 वर्षाचे असताना देखील मैदानात उतरलात व भर पावसात भाषण देऊन उभ्या तरुणाईला वेळ आपण लावलत साहेब आम्ही शिकलोय तुम्च्याकडून संघर्ष क रायला ...
साहेब महाराष्ट्राचा विकास करायचा असेल व महाराष्ट्रला no.1 वर आणायचे तर आम्हाला गरज आहे तुम्च्या नेतृत्वाची आणी आप्ल्या विकासाच्या धोरणाची .. म्हणून म्हणने साहेब आपला निर्णय परत फिरवा .
सचिन पाटील युवा कार्यकर्ता फुलगांव : - :Sharad Pawar साहेब आपण नेहमी म्हणत आसता मी काय म्हातारा झालोय काय...?मग हा निवृत्तीचा निर्णय का ? या कठीण काळात आपल्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र पुन्हा दिल्ली चे तख्त राखन्याच स्वप्न उराशी बाळगून आहे.आमच्या सारख्या तरुणांना तुमची गरज आहे आपला निर्णय मागे घ्या साहेब .
समाधान चौधरी सिध्देश्वर नगर वरणगांव :Sharad Pawar साहेब आपण नेहमी म्हणत असता मी काय म्हातारा झालोय काय...?मग हा निवृत्तीचा निर्णय का ? या कठीण काळात आपल्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र पुन्हा दिल्ली चे तख्त राखन्याच स्वप्न उराशी बाळगून आहे.आमच्या सारख्या तरुणांना तुमची गरज आहे आपला निर्णय मागे घ्या साहेब .