Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


कर्नाटकमधील कॉग्रेसच्या विजयाचा वरणगांव येथे महाविकास आघाडीतर्फे जल्लोष

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाल्याने वरणगावात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस प्रचंड घोषणाबाजी केली आहे राहुल गांधी तू आगे बढो हम तुम्हारे साथ है महाविकास आघाडीचा विजय असो अशा प्रकारे घोषणा देण्यात आले आहे
कर्नाटक पासून देशात विजयाला सुरुवात झाली आहे असा आत्मविश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला आहे
येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचाच विजय होईल असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला आहे यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश बोदडे काँग्रेसचे शहराध्यक्ष अशपाक काझी शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी दीपक मराठे प्रकाश नारखेडे संतोष सोनवणे व असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.