कर्नाटक मध्ये झालेल्या नुकत्याच विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाला साफ नाकारले आहे . देशात प्राबल्य कमी झालेल्या काँग्रेसला भाजप पेक्षा दुप्पट जागा मिळवून विजय मिळाला आहे , त्यामुळे स्पष्ट होते की 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्राबल्य देशात कमी होत चालले आहे .
भाजपाचे नकली हिंदुत्व हे कर्नाटकच्या जनतेच्या लक्षात आल्याची जनभावना या निवडणुकीत दिसून आली आहे . तसेच ईडी , निवडणूक आयोग सी बी आय या सरकारी यंत्रणाचा गैरवापर होत असल्याची ओरड कर्नाटकी जनतेच्या लवकर लक्षात आली . आणि भाजपने निवडणूकीत बजरंग बली चे नाव घेऊन सुद्धा राम भक्तहनुमंताला सुद्धा भाजपचे बेगडी हिंदुत्व आवडले नसल्याची भावना व्यक्त होत आहे .
देशात सत्तेवर असलेली भाजपा 66 जागांवर तर काँग्रेस 133 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र असून जेडीएसला 22 जागावर समाधान मानावे लागत आहे . भाजपने सत्तेचा दावा केला होता परंतु जेडीएस ने सुद्धा आम्ही किंग मेकर राहू असे जाहीर केले होते .परंतु राहुल गांधींनी केलेल्या भाषणाचा चांगला प्रभाव कर्नाटकी जनतेवर झालेला दिसून येत आहे .भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा कर्नाटक मध्ये विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती .देशाची देशातील भाजपचे दिग्गज नेते कर्नाटक मध्ये प्रचारासाठी दाखल झाले असताना या ठिकाणी त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला आहे . त्यावरून सिद्ध होते की कर्नाटकच्या जनतेला भाजपाचा बनावट चेहरा लक्षात आला असेच म्हणायला हरकत नाही . महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजपने केलेला आटापिटा आज शेजारच्या राज्याच्या चांगला लक्षात आलेला दिसतो . काल शिंदे सरकारला वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांकडे बोट दाखवून काढता पाय घेतला असला तरी नापास झालेल्या व्यक्तीला सत्तेवर राहू देत निकाल दिला होता .शिंदे सरकारच्या विजयाचे फटाके फोडल्या नंतर दुसऱ्या दिवशी भाजप ला आत्मचिंतन करण्याची वेळ आज आली आहे . कर्नाटकात दर निवडणुकीत सत्ता बदल होते हे सत्य असले तरी मोदी लाट काही . राज्यातून हद्दपार होत असल्याचे हे संकेत आहे असे म्हणायला हरकत नाही .