[ .सतिष पाटील प्रतिनिधी भडगांव ]
वृंदावन हॉस्पिटल पाचोरा व भराडी महिला ग्राम संघ ग्रामपंचायत कजगाव तालुका भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर नुकतेच पार पडले आहे .
किडनी स्टोन , हाडाचे आजार , लहान बाळाचे तपासणी , बीपी ,शुगर तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले आहे .
या शिबिरात डॉक्टर निळकंठ पाटील एमबीबीएस अस्थिरोग तज्ञ , डॉक्टर भरत पाटील एमबीबीएस एमडी मेडिसिन जनरल फिजिशियन , डॉक्टर रोहन नाईक एमबीबीएस बालरोग तज्ञ , डॉक्टर कल्पेश पाटील मुळव्याध व भगंदर यांनी तपासणी केली आहे .
शिबिर यशस्वीतेसाठी कजगाव ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच ,सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य , महिला ग्राम संघ कजगाव , आशा सेविका सर्व गावकरी मंडळी यांनी मेहनत घेतली आहे . ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला आहे .