Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे रद्द केल्याने वरणगांव येथे जल्लोष



 राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे जाहिर केले होते . त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आमदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी राजीनामा देवू नये ' यासाठी महाराष्ट्रातील सर्व च कार्यकर्त्यांनी विनंती पत्रे लिहून पाठविली होती . वरणगांव च्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना सोशल मिडीयाचा माध्यमातून अतिशय भावनिक पद्धतीने मांडल्या होत्या .परिणाम म्हणून शरद पवार यांनी राजीनामा न देण्याची घोषणा केली . त्यामुळे वरणगांवात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला . यावेळी राष्ट्रवादी युवाचे जिल्हा उपप्रमुख प्रा वाय आर पाटील ' जिल्हा उपप्रमुख राजेन्द्र चौधरी ' समाधान चौधरी ' रविन्द्र कोळी ' महेश सोनवणे ' इफ्तेखार मिर्झा ' सुधाकर जावळे ' दिपक ठोकळे ' यांचेसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.