Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगांव पंचायत समितीच्या प्रकरणात फिर्यादी व साक्षीदार अडकणार

[सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी ] 
भडगांव पंचायत समिती प्रकरणा बाबत
"चोरी च्या खोटी फिर्यादीत '"बीडीओ वाघ यास.फेरआरोपी करण्याची मागणी विजय पाटील यांनी केली आहे
भडगांव - पं. समितीचे तत्कालिन.बीडीओ दिपाली कोतवाल (रावेर) यांचा शौचांलय भ्रष्टाचार लपविण्याच्या षंडयत्रात खोटी फिर्याद दाखल केली म्हणून खालील काही जबाबदारावर फौ.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया फेर सुरू करण्यात आली आहे ..
या प्रकरणी .पळासखेडे २०७ बोगस लाभार्थी पैकी३५ लाभार्थी २७ वर्षां पूर्वीचे काही तीसरी / दुसऱ्या पीढीचे मयताची शौचांलयअपहारची चौकशी करण्यात आली.
    सदर पुरावे नष्ट करण्याचे हेतूने मुख्य सुत्रधार बीडीओ रमेश वाघ यांनी फाईली जाळून नष्ट करून खालील साक्षीदार ऊभे करून दप्तंर फाईलीची दरवाजा/कडी कोडा तोडून पंचायत समितीत चोरी झाली अशी खोटी फिर्याद षडयंत्र रचून  ३९/२०२२दाखल केली होती.. परंतू पोलिसांनी सखोल चौकशी केली असता फिर्याद खोटी दाखल केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले . तसा  फायनल अहवाल कोर्टात सादर केला आहे.त्या संदर्भात फेर फिर्यादी सह साक्षीदार वर फौजदारी गुंन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  भडगाव पोलिसाना व मे.न्यायालयात आदेश करण्याची मागणी विजय पाटील यांनी केली आहे.
भडगांव पं.समितीचे खालील फिर्यादी/ व  साक्षी देनारे बनाव रचनारे कांहीं व्यक्ती वर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे १) बीडीओ रमेश वाघ २) फिर्यादी: रवींद्र दशरथ जगताप.३) स.समन्वयक; चिंतामण राठोड.४) सहा.कार्य.अधिकारी.ईद्रायणी भारूडे.५)कुंदन भागवत पाटील ६) विनोद पाटील ७) योगेश सिरसाठ ८) सुहास युवराज पाटील. शिपाई ९) रोहीत भैय्या पाटील १०) मिना मोरे..व ईतर यांचे  पोलिस चौकशीत जबाब ,/साक्षी घेण्यात आले आहेत.. त्या अनुषंगाने फेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.फाईलीची चोरी झाली नसताना खोटी फिर्यादीची दखल न्यांयालयाने ही घेतली आहे . या कारणाने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.