बोदवड तहसील कार्यालयात गेल्या दीड वर्षापासून कायमस्वरूपी तहसीलदार नाही वेळोवेळी प्रमोद घामोळे या समाजसेवकाने उपोषण व आंदोलन करून तहसीलदाराची मागणी केली तरीसुद्धा सरकारने अद्याप पर्यंत दखल घेतली नाही .
सदर समाजसेवकाने चक्क तहसील कार्यालय विक्री करावी अन्यथा मंगल कार्यालयासाठी भाड्याने देण्यात यावे यासाठी परवानगी मिळण्याची पत्र तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे . निवेदनात म्हटले आहे की वेळोवेळी आंदोलन उपोषण करून सुद्धा सरकार झोपेचे सोंग घेत नसून बोदवड तालुक्याला दोन आमदार असून सुद्धा जर वरपर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नसेल तर सदर सुसज्ज बांधलेल्या कार्यालय विक्री कर ण्याची परवानगी द्यावी अथवा मंगल कार्यालयासाठी भाड्याने द्यावे कारण तहसीलदार नसल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचे अनेक प्रकरणे प्रलंबित आहे तहसीलदार कार्यालय विक्री करण्याची परवानगी मागण्याची ही परिसरातील पहिलीच वेळ असल्याचे समजते .