वरणगाव येथुन जवळच असलेल्या सुसरी ता . भुसावळ ते वेल्हाळा पर्यंत च्या रस्त्याचे काम सुरु आहे . त्यावर टाकण्यात आलेला मुरूम हा आजुबाजुच्या शेतकऱ्यांच्या बांधाजवळून खोदून टाकला जात असल्याचा आरोप शेतकरी बांधवांनी केला आहे .
या कामासाठी १७ लाख ९० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . परंतु रस्त्यावर टाकण्यासाठी लागणारा योग्य पद्धतीचा मुरूम दुसरी कडून न आणता याच रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या शेतकर्यांचे बांधाजवळील माती मिश्रीत मुरूम जेसीबीने खोदून टाकला जात आहे .
तसेच त्यावर टाकण्यात येणारी खडी सुद्धा योग्य जाडीची नसुन विरळ पद्धतीने फक्त नावापुरती टाकली जात आहे . त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ठ पद्धतीने होत असुन हा रस्ता किती दिवस टिकेल? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे . संबंधित ठेकेदाराला एका बड्या नेत्याचा आशीर्वाद असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे . सदरील सुसरी ते विल्हाळ्यापर्यंत च्या रस्त्याचे कामाबाबत योग्य ती चौकशी करून परिसरातील शेतकर्याना न्याय मिळवून देण्याची मागणी भरत आत्माराम चौधरी सह इतर शेतकर्यांनी केली आहे .