Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बियाण्या बाबत सरकारला गांर्भिय नाही , शेतकरी संघटनेचे संदीप पाटील यांचा आरोप

*बोगस बियाणे नव्हे..सरकार बोगस आहे:
   [सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी ]
 
      शेती हा व्यवसाय स्वतंत्र आहे मग शेतकऱ्यांनी कधी पेरणी करावी हे ठरणार सरकार कोण सरकारला शेतकऱ्यांची एवढी  काळजी आहे तर शेतात निघणारे *ज्वारी मका हरभरा व धान या पिकांची खरेदी वेळेवर का होत नाही?? त्या खरेदीला सरकारचे बंधन का नाही वेळ निघून गेल्यावरती खरेदी केंद्र चालू करणारे सरकार पेरणी बाबत दबाव का वापरत आहे . सरकारला तो अधिकारच नाही संपूर्ण जगात तंत्रज्ञानाचे धडे दिले जात असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान युक्त  एच टी बिटी ला प्राधान्य द्यायलाच हवं तरच शेतकरी तन नियंत्रण करता येईल व उत्पन्नही वाढेल मात्र सरकार एसटीबीटीला परवानगी देत नाही वरून बोगस बियाणे म्हणून बोंब ठोकण्याचं काम सरकार दरवर्षी करत आहे *ज्या शेतकरी बांधवांना एसटीबीटील (तननाशक प्रतिबंधक, राऊंड बीटी, फोर जी फाईव्ह जी बी टी बियाणे) त्यांनी सरकारला न घाबरता आपल्या शेतात तंत्रज्ञान बियाण्याची लागवड करा तुमच्या पाठीशी शेतकरी संघटना खंबीरपणे उभी आहे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गावागावात हे बियाणे विक्री करतील आम्ही २० मे पासूनच कापूस लागवड करू १ जून ची सक्ती नको*  अशी माहिती शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संदीप पाटील यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.