Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वंचित आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित् भुसावळ येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न


     वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचा आज वाढदिवस वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून साजरा करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्तांत असा कि वंचित बहुजन आघाडीचे  सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस भुसावळ येथे साजरा करण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी व गोदावरी फाउंडेशन,डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या सहयोगाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रवीकांत जी वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचितचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे होते.
 सदरचे वैशिष्ठ्य म्हणजे शिबिरामध्ये डॉ उमेश काशिकर,डॉ शुभांगी जयस्वाल,डाॅ जिगिशा रेड्डी,जनसंपर्क अधिकारी हितेश कोल्हे नर्सिंग स्टाॅप समिक्षा ठोंबरे,गौरव पाटिल  डॉक्टर्स उपलब्ध होऊन त्यांनी रुग्णांची तपासणी केली.
सदर कार्यक्रमास जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे, माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, जिल्हा संघटक अरुण तायडे, जिल्हा I T प्रमुख सचिन बाऱ्हे,शहर महासचिव देवदत्त मकासरे  मेजर,म आ जिल्हा महासचिव वंदना आराक,अतुल पाटिल,दिलीप भालेराव,पंकज सपकाळे,आकाश बागुल,छायाताई हिरोळे आदींची उपस्थित लाभली.
आरोग्य शिबिरात महिलांसह रुग्णांनी लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.