महात्मा गांधी विद्यालय वरणगाव क्रीडा शिक्षक श्री आशिष चौधरी सर यांना क्रीडा गौरव पुरस्कार घोषित* करण्यात आला आहे .
त्यांची विभागीय आदर्श क्रीडा गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे . शारीरिक शिक्षक म्हणून घडवलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय तसेच महाविद्यालयीन , राज्य, राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूसाठी आपल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपली निवड पुरस्कार समितीने केली आहे.
14 मे 2023 रोजी धुळे येथे क्रीडा क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी इतर मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. आधी सुद्धा जळगाव जिल्हा क्रीडा विभाग कडून जिल्हा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
द वरणगांव एज्युकेशन सोसायटी वरणगाव संस्थेचे शालेय समिती चेअरमन सहकार मित्र श्री चंद्रकांत हरी बढे सर , संस्थेच्या अध्यक्षा वंदना पाटील, यांचे सह संस्थेचे सर्व पदाधिकारी, महात्मा गांधी विद्यालय मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व स्टाफच्या वतीने त्याचबरोबर वि का सोसायटी वरणगाव, जिल्हा क्रीडा यांच्या वतीने, मित्र, नातेवाईक, विविध संघटनांकडून आशिष चौधरी सर यांचे अभिनंदन होत आहे .