Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


यावल तालुक्यातील पाडळसे येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने वार . तरुणी जखमी



      यावल तालुक्यातील पाडळसे येथे २३ वर्षाची तरुणी प्रातविधी साठ बाहेर गेल्यावर तिच्या मागे त्या घरा समोर राहणार्या तरुणाने जाऊन शौचालयातच या तरुणीवर  चाकूने तीन ठीकाणी वार केला आहे.  
भर गावात  हा थरार घडला. वार करणारा तरुण  स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. तरुणीच्या घरासमोर राहणाऱ्या तरुणाने विनाकारण त्रास देणे सुरु केले होते. काल त्याने हद्द करीत थेट तिच्यावर चाकूहल्ला चढविला. यात तिने पोटावरील वार चुकविला, मात्र चेहऱ्यावर डाव्या बाजूने , खांद्यावर चाकूचे वार झाल्याने तरुणी रक्तबंबाळ झाली. तिच्यावर  जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. 21वर्षाची तरुणीच्या घरासमोर राहणारा कल्पेश अशोक सपकाळे हा तरुण तिला विनाकारण त्रास देत होता. भीतीपोटी ती दुर्लक्ष करीत होती. मंगळवारी ती गावात जात असताना कल्पेशने पाठलाग सुरु केला. तिने जाब विचारताच, तो तिला चाकू दाखवून धमकावू लागला. तिने त्याला विरोध करताच त्याने पोटात चाकू मारण्याचा प्रयत्न केला. तिने वार चुकविले. मात्र चेहऱ्यावर डाव्या बाजूला व डाव्या खांद्यावर चाकूचे ३ वार केले. ग्रामस्थांनी तिला रक्तबंबाळ अवस्थेत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.