वरणगांव आयुध निर्माणी मध्ये चार वाजेच्या सुमारास सुरक्षेचे चार आणी पाच नंबर च्या घुमटी च्या मधे आग लागली होती आग एवढी भीषण होती कि बाहेरून १६ फायर वाहने बोलाविण्यात आले होते . तीन तासा नंतर आग आटोक्यात आणली गेली होती .
आग रिकाम्या जागेत गवताला लागल्याची व त्या ठिकाणी कोणतेही स्फोटक पदार्थ नसल्याची माहीती वरणगाव आयुध निर्माणीचे माहीती अधिकारी महेश शिंदें संयुक्त महाप्रबंधक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे .
भुसावळ,सावदा, रावेर,जळगांव, फैजपूर, दीपनगर, वरणगांव ,जामनेर या ठिकाणाहून आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेड च्या गाड्या बोलाविण्यात आलेल्या होत्या .दुपारी चारच्या सुमारास कारखान्याच्या आतील परिमितीच्या भिंतीला आग लागली. उन्हाळा आणि वादळी हवामानामुळे ते लवकर पसरते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ओएफव्ही अग्निशमन युनिटसह जळगाव महानगरपालिका, भुसावळ नगरपरिषद, सावदा नगरपरिषद, दीपनगर औष्णिक प्रकल्प, आयुध निर्माणी भुसावळ आणि जैन इरिगेशन जळगाव यांच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अधिक तापमानामुळे वणवा पेटल्याची माहीती समोर येत आहे .
अमन मित्तल जिल्हाधिकारी जळगाव, गजेंद्र हिरे वनसंरक्षक वन नाशिक, प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवित वा मालमत्तेची हानी झालेली नाही.
सर्व अधिकारी व कर्मचारी याठिकाणी शर्थीचे प्रयत्न करीत होते . वरणगांव पोलीस स्टेशनचे अधिकारी परशुराम दळवी , पोहेकॉ राहुल येवले आपल्या स्टॉप सह गेटवर उपस्थित होते .