भुसावळ शहरात गावठी कट्टा व काडतूस घेवुन दहशत निर्माण करीत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील त्रिकूट भुसावळ पोलीस उप विभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत .
आरोपींच्या ताब्यातून दोन जिवंत काडतुस व गावठी कट्टा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे . ललित तुलशीदास खरारे , वय 22 , जितेंद्र आनंद बोयत ,वय 23 व पवन किसन खरारे वय 27 राहणार वाल्मिक नगर भुसावळ अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत . पोहेकॉ सुरज पाटील , रमण सुरळकर , संकेत झांबरे . यासीन पिंजारी हे पोलीस पथक होते .
भुसावळ शहरातील वाल्मिक नगरातील संशियताकडे गावठी कट्टा व जिवंत काडतुस असून त्या आधारे तो दहशत निर्माण करीत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती उपनिरीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळाली होती त्यांनी पथकाला कारवाईच्या आदेश दिले होते . शुक्रवारी दुपारी पावणे चार वाजता पथकाने तीन संशयितांना अटक करीत त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपये किमतीचा कट्टा व दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस व तीस हजार रुपये किमतीची दुचाकी व 27 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा ८४ ००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
आरोपी च्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच 19 सीए 22 65 ही गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे .
पोलीसांची ही महत्वाची कामागिरी असून याप्रकरणी बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .