Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ रेल्वे विभागाचा पुन्हा प्रवाश्यांवर अन्याय , पुणे जाणारी हुतात्मा एक्सप्रेस तब्बल एक महिन्यासाठी बंद


 भुसावळ रेल्वे विभागाच्या दिवसेंदिवस प्रवाशांवर होत असलेला अन्याय सुरूच असून भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस 20 मे पासून एक महिन्यासाठी बंद करण्यात आली . असून सदरची गाडी इगतपुरी पर्यंत धावणार असल्याचे रेल्वे सूत्राकडून माहिती मिळत आहे . यापूर्वी सदरची एक्सप्रेस गाडी  तीन ते चार महिन्यासाठी बंद करण्यात आली होती . ही गाडी सुरू झाल्यानंतर पुन्हा हे गाडी बंद करण्यात आलेली आहे .सध्या शाळांना सुट्टी आहे तसेच लग्न सराईचे दिवस आहे .भुसावळ जळगाव परिसरातील अधिकाधिक नागरीक पुणे येथे नोकरी व्यवसाय निमित्त गेलेले आहे . त्यामुळे त्यांना या मे.जुन . महीन्यान महत्वाच्या कामा साठी येणे जाणे आवश्यक असते . भुसावळ हुन सुटणारी पुण्यासाठी ही एकमेव गाडी आहे . रेल्वे विभागाचा वारंवार पुणे परिसरात जाणाऱ्या गाड्यांवर अन्याय केला जातो . यावर रेल्वेमध्ये असलेली समन्वय समिती नेमके काय करीत आहे हा प्रश्न आहे . या समिती चा  अधिकार्‍यावर प्रभाव नसल्याचे समजते . तसेच परिसरात असलेल्या लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे यांनी तरी रेल्वे प्रशासनावर याकडे लक्ष देण्यास भाग पाडावे . रेल्वे प्रवाशावर भुसावळ विभागात वारंवार रेल्वे अधिकाऱ्याकडून या प्रकारचा अन्याय होत आहे .कालच अचानक एक मेमो गाडी यांनी रद्द करून प्रवाशांना चांगले झाल्यावर धरले होते . याबाबत सर्वच  लोक प्रतिनिधी राजकीय पक्ष गप्प बसलेले आहे . रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आपला मनमानी कारभार बंद करावा अन्यथा भुसावळ परिसरातील जनता  आंदोलन उभारले अशी जनमानसात चर्चा आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.