Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळात खंडणी मागणाऱ्या संशयितांना पोलीसांनी घटनास्थळापर्यत पायी फिरविले



भुसावळ शहरातील रवींद्र खरात हत्याकांडातील आरोपी राजा मोघे याने दोन पंटरांना व भावाच्या माध्यमातून शहरातील दोन व्यापाऱ्यांना धमकावल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत 24 तासाच्या अंतराने दोघा आरोपींना अटक केली होती . व्यापाराकडे खंडणी मागताना पैसे न मिळाल्यास गोळीबार करण्याची तसेच दुकान तोडफोड करण्याची धमकी दिली होती . या प्रकाराने शहरात व्यापारी वर्गात प्रचंड भीतीच्या सावटाखाली असल्याने अटकेतील दोघा आरोपींना शहर पोलिसांनी वाहनातून जेथे जेथे गुन्हा केला तेथे नेले तसेच वाहन तेथे लावले त्या भागातील सीसीटीव्ही तपासून आरोपींची विचारपूस केली दरम्यान पोलिसांनी यावेळी दोघा आरोपींना अलटून पालटून चांगलेच धारेवर धरले आहे . पोलिसांच्या या कृतीचे व्यापारी वर्गातून स्वागत झाले आहे यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती यावेळी पोलिसांनी कोणालाही फोटो किंवा व्हिडिओ काढू देण्यास मनाई केली होती .
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर निरीक्षक गजानन पडघम हे अधिक तपास करीत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.