Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगांव शेतकरी सहकारी संघाचे मतदान शांततेत . आता निकाला ची उत्सुकता . अनेक नेते होते ठाण मांडून

 [ सतिष पाटील  तालुका प्रतिनिधी  प्रतिनिधी ]

भडगाव शेतकरी सहकारी संघासाठी शांततेत  मतदान पार पडले आहे  मतमोजणी. निकालाची लागली उत्सुकता.सर्वपक्षीयांचे निवडणुकीसाठी जोर लगाके हय्या..  ८०.६६टक्के झाले मतदान .
भडगाव शेतकरी सहकारी संघ  या संस्थेच्या सन २०२३ ते २०२८ साठी  पंचवार्षीक निवडणुकीसाठी  दि. २१ मे रोजी मतदान शांततेत  झाले.  संस्थेच्या एकुण १५ जागांसाठी ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.सरळ २ पॅनलमध्ये समोरासमोर लढती रंगल्या आहेत. सोसायटी गटाचे ४१ ठराव मतदानापैकी  ४१ ठरावधारक इतक्या ठरावधारक सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ४ हजार ३१२ मतदानापैकी  एकुण ३५ हजार ४ 
मतदान भडगाव येथील बाळद रस्त्यालगत डी एड काॅलेजमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकुण ८०.६६ टक्के मतदान झाले. मतदान हे सकाळी ८ ते ४ वेळेत झाले. मतदानावेळी मतदान केंद्राबाहेर सर्वपक्षीय नेते मंडळींसह, कार्यकर्ते, पदाधिकारी दिवसभर गर्दी होत ठाण मांडुन बसले होते. पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी प्रमाणे भडगाव शेतकरी सहकारी संघाचीही पंचवार्षीक निवडणुक प्रथमच रंगतदार झाल्याचे दिसुन आली. बाजार समितीच्या निवडणुकीप्रमाणे भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीतही मतदारांना लक्ष्मीचे दर्शन झाल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीय मंडळी सर्वताकत पणाला लावुन उतरल्याचे दिसुन आले. त्यामुळे ही निवडणुक सर्वपक्षियांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. माञ या निवडणुकी कोणते पॅनल बाजी मारते , कि संमिश्र पॅनल निवडुन येते. याकडे तालुक्याचे लक्ष लागुन आहे. मतदानासाठी एकुण ९ बुथ होते . मतदानासाठी १५ पोलीस कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी असे एकुण ६५ च्या जवळपास निवडणुककामी कर्मचारी नेमण्यात आलेले होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक महेश कासार, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अविनाश पाटील, सेक्टर आँफीसर म्हणुन भाऊसाहेब महाले यांचेसह नेमणुक केलेल्या अधिकारी, कर्मचारी निवडणुक यंञणेने कामकाज पाहीले. भडगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त बजावला.
 याबाबत माहीती अशी कि, भडगाव येथील शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षीक निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आमदार किशोर पाटील यांचे सत्ताधारी शिवसेना, भाजप, रिपाई आठवले गट, पी आर पी युतीचे शेतकरी विकास पॅनल या निवडणुकीत आहे. तर राष्टृवादीचे माजी आमदार दिलीप वाघ,  संजय वाघ,  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपराव पवार, उद्धव ठाकरे शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांचे महाविकास आघाडीचे व भाजपाचे  नेते अमोल शिंदे असे संयुक्तीक सहकार विकास आघाडीचे पॅनल असे हे दोघेही पॅनल निवडणुकीच्या आखाडयात उतरलेले होते . निवडणुकीचे घमसान मे हिटच्या  तापत्या वातावरणात राजकीय वातावरण ढवळुन निघाले आहे.  दोघा पॅनलचे नेते , कार्यकर्ते, उमेदवार हे मतदान केंद्राबाहेर दिवसभर ठाण मांडुन बसलेले होते. मतदानाला जातांना मतदारांशी संपर्क साधुन आम्हालाच मतदान करा असे राम राम करीत संपर्क साधतांना दिसुन आले. मतदानकेंद्राबाहेर शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील, राष्टृवादीचे माजी आमदार दिलीप वाघ,  संजय वाघ, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपराव पवार, पाचोरा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचेसह सर्वपक्षीय नेतेमंडळी ठाण मांडुन बसलेली होती. पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षीक निवडणुक गाजल्यानंतर ही निवडणुक प्रथमच चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वपक्षीयांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची ठरणार आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन भडगावचे सहाय्यक निबंधक महेश कासार हे कामकाज पाहत आहेत.
१५ जागां मध्ये यात ६ जागा विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघ, ४ जागा व्यक्तिशः मतदार संघ, १ जागा अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ,  १ जागा इतर मागासवर्गीय मतदार संघ , १ जागा वी जा म ज मतदार संघ, २ जागा महिला राखीव अशा जागा आहेत.
 या निवडणुकीत १५ जागांसाठी एकुण ३० उमेदवार रिंगणात  आहेत .
सर्व साधारण संस्था मतदार संघात ९  उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. 
 व्यक्तिशः मतदार संघात १० उमेदवार रिंगणात 
महिला मतदार संघात ४ उमेदवार रिंगणात.
इतर मागास वर्ग मतदार संघात २ उमेदवार रिंगणात .
अनु जाती जमाती मतदार संघात २ उमेदवार रिंगणात .
विमुक्त जाती भटक्या जमाती, विमाप्र मतदार संघात ३ उमेदवार असे एकूण ३० उमेदवार  रिंगणात आहे .  भडगाव तालुक्यात विकासोचे ४१ ठराव धारक सभासद 
तसेच ४ हजार ३१२ मतदार संख्या होती. पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या पंचवार्षीक निवडणुकीत सभासदांना लक्ष्मी दर्शन  झाले होते . आता भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीतही सभासदांना लक्ष्मी दर्शन झाले असल्याचे नागरीकातुन बोलले जात आहे. या निवडणुकीत नेमके काय घडले? हे मतपेटीतुनच मतमोजणीच्या दिवशीच चिञ समोर येणार आहे. शेतकरी सहकारी संघात सत्तेची बाजी कोण मारतो? याकडे सपुर्ण तालुक्याचे लक्ष लागुन आहे. शेवटी मतपेटीतुनच कोण हारा कोण जिता? हे समजणार आहे.  आमदार किशोर पाटील यांचे विरोधात सर्वपक्षीय पॅनेलचे सर्वपक्षीय मंडळी एकञ आल्याने या निवडणुकीला म्हत्व आले आहे. या निवडणुकीत समासद कोणत्या पँनलकडे आपला मोर्चा वळवितात. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान देणारे भाजपाचे नेते अमोल शिंदे बाजार समिती निवडणुकीनंतर  पँनलचे अपयश
पचवुन भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत हम साथ साथ है असे चिञ आहे. यावरुन पाचोरा बाजार सामितीच्या निवडणुकीत विरोधातअसणारे हे सर्व पक्षीय नेते एकञ आहेत असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तुविला जात आहे.  या सर्व
पक्षीय नेत्यांची भडगाव
येथील शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षीक निवडणुकी राजकीय प्रतीष्ठा पणाला लागल्याचे दिसत आहे. परंतु भाजपाचे विधानसभाचे उमेदवार अमोल शिंदे
यांच्या उमेदवारी अन आजच्या सोबतच्या सर्वपक्षीय नेत्यांची भुमिका काय राहील? हे आज आपण सांगु शकत नाही.
मा आतामतदान झाल्यानंतर दुसर्या दिवशी दि. २२ रोजी मतमोजणी होउन निकाल लागणार आहे. मतमोजणी ही भडगाव येथील डी एड काॅलेजमध्ये सकाळी होणार आहे. मतमोजणीसाठी एकुण  ८ टेबल लावण्यात आलेले आहेत. याकामी २४ कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. अशी माहीती भडगाव सहाय्यक निबंधक कार्यालयाचे प्रमुख प्रेमसिंग पाटील यांनी दै. लौकमतशी बोलतांना दिली. या मतदानावेळी सर्वे केला असता बाजार समितीतीच्या निवडणुकीप्रमाणे भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत संमिश्र मतदान झाल्याचे पहावयास मिळाले. मतदान पेटीतुनच विजयी तीमेदवारांसह पॅनलच्या उमेदवारांचे भाग्य सीम सीम खुवज्या याप्रमाणे खुलणार आहे. एकीकडे आमदार किशोर पाटील व सर्वपक्षीय नेते मंडळी सत्ता खेचण्यासाठी एकञ आलेले आहेत. हे आमदारांसाठी विधानसभेच्या दृष्टीने मोठे आव्हान तोलावे लागणार आहे.आगामी विधानसभेच्या दृष्टीने या निवडणुकीचा निकाल सर्व पक्षीय नेत्यांना मोलाचा जरी ठरत असला तरी
विधानसभा निवडणुकीत आज एकञ
येणार्या नेत्यांना डोकीदुखी ठरणार आहे. हे ही पुढची विधानसभेची डोकीदुखी
आजच्या चिञावरुन ठरणार आहे. अशी नागरीकात चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.