आरटीईनुसार दरवर्षीप्रमाणे 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात आली त्यानुसार 2023 24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या सोडत मध्ये जळगाव जिल्ह्यातील 2983 विद्यार्थ्यांची निवड झाली त्यातील 1749 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत दरम्यान आठ मे पर्यंत असलेली मुदत वाढ 15 मे पर्यंत केली आहे जिल्ह्यात 281 शाळा प्राप्त झाल्या असून त्यात 381 जागा आहेत यासाठी 11290 अर्ज प्राप्त झाले आहे दरम्यान प्रवेश निश्चित करतेवेळी सर्वर डाऊन मुळे पालकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला आहे .त्यातच आठ मे पर्यंत मुदतवाढ असल्यामुळे सर्वर अधिक लोड पडत होता .आता शासनाने 15 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे
ज्या विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत निवड झाली आहे त्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा असे आवाहन शिक्षण अधिकारी किशोर वायकोळे यांनी केले आहे
उद्या प्राचार्याची मीटिंग लावण्यात आली आहे त्यात सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण अधिकारी किशोर वायकोळे यांनी दिली आहे