Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


रावेरच्या व्यापार्‍याची १६ लाखात फसवणूक करणारा दुसरा आरोपीही जेरबंद



रावेर शहरातील व्यापारी मोहनलाल पटेल यांची बांधकामास लागणारे स्टील मटेरियल पाठवण्याच्या आमिषाने 16 लाखात ऑनलाईन फसणूक झाली होती .
 याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली होती . दुसऱ्याला सायबर पोलिसांनी मुंबईमधून अटक केली आहे मोहम्मद आफताब असगर अली वय 43 साकीनाका मुंबई असे अटकेतील संशयिताचे नाव आहे .
मोहनलाल देवजी पटेल यांनी याबाबत जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती .मोहनलाल  यांना संशयित ललित कुमार तुळशीराम खंडेलवाल यांनी फोनवरून आमची आयएसओ टॉप इंडिया मेटल ट्रेडर्स नावाची कंपनी असून आम्ही तुम्हाला बांधकाम साठी लागणारे स्टील मटेरियल पाठवतो . असे सांगून विश्वास संपादन केला होता . हा गुन्ह  नोव्हेंबर दरम्यान हा गुन्हा घडला होता . तसेच त्यांना टॅक्स इन्व्हर्स व बनावट ई बिल पाठवून त्यांच्याकडून वेळोवेळी 16 लाख 27 हजार 800 रुपये घेऊन त्यांचे ऑनलाइन फसवणूक केली याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर 15 मार्चला संशयीत ललित कुमार खंडेलवाल याला सायबर पोलिसांनी सुरत मधून अटक केली होती .
या प्रकरणात दुसरा संशयित आरोपी मोहम्मद अबताब असगर अली साकीनाका मुंबई हा निष्पन्न झाला होता त्यानुसार त्याचा शोध सुरू होता त्याची माहिती मिळाल्यावर पोलीस त्यांच्या मार्गावर होते अखेर सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याला मुंबई येथून अटक केली आहे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर पोलीस , कर्मचारी श्रीकांत चव्हाण , वसंत बेलदार ,ललित नारखेडे आदींनी आरोपीला अटक केली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.