शेगाव येथील गजानन महाराज संस्थान व्दारा संचलित आनंद सागर मधील अध्यात्मिक केंद्राचा काही भाग सुरू करण्यात आला आहे . आनंद सागर मधील अध्यात्मिक केंद्रात प्रवेश निशुल्क असून सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आनंद सागर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे . ४ वाजे नंतर प्रवेश बंदी करण्यात आली आहे . शासन निर्देशानुसार कोविड काळापासून व काही अपरिहार्य कारणा नुसार आनंद सागर बंद करण्यात आले होते .
हा संस्थेचा सेवाभावी उपक्रम असून या ठिकाणचे विकासकामे सुद्धा थांबवण्यात आले होते . संस्थेच्या विश्वस्त मंडळाने आनंद सागर बाबत निर्णय घेतला असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात येईल असे संस्थांनतर्फे सांगण्यात आले आहे .
परंतु या ठिकाणी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने इतर सेवा सुविधा बंद आहे . व या कार्याचे पुर्न निर्माण करण्यात येईल असे विश्वस्त मंडळा तर्फे सांगण्यात आले आहे .अनेक दिवसापासून आनंद सागर बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर असल्याने विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतलेला आहे . ही माहिती भाविकांसाठी देण्यात आली असून भाविकांनी आनंद सागर चा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे .