याबाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहीती नुसार येथील सातारा इमाम वाडा येथील रहिवाशी इमरान मुक्तार सय्यद असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
चार महिन्यापूर्वी मामाच्या घरासमोर उभा राहून इमरान याने पीडित मुलीला इशारा करून बोलावले होते . मामाच्या घरात कोणी नसताना त्याने पीडित मुलीला घरात नेऊन ती अल्पवयीन असताना देखील तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध निर्माण केले होते . ती गर्भवती झाली. पीडित मुली सोबत सेल्फी काढून तो इंस्टाग्राम वर कथानक स्वरूपात ठेवला.
गर्भवती अल्पवयीन पीडीतेने भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार इमरान यांच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला भाग ५ गु रंन ८३/२३ भा.द.वी ३७६ ३७६ ३५४( अ)) (१)(आय) सहलैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ४ ८,१२नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे करत आहे. या घटनेने भुसावळात खळबळ माजली आहे