जळगांव येथे राष्ट्रीय सह संघटन मंत्री श्री.शिवप्रकाशजी* यांच्या मार्गदर्शनात प्रमुख मार्गदर्शनात तथा प्रदेश संघटन मंत्री श्री. रविजी अनासपुरे, जिल्हा प्रभारी श्री.विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष आ.सुरेश (राजुमामा) भोळे व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थितीत “बुथ सशक्तीकरण अभियान” अंतर्गत जळगांव जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत राष्ट्रीय सह संघटन मंत्री श्री.शिवप्रकाशजी, प्रदेश संघटन मंत्री श्री. रविजी अनासपुरे, जिल्हा प्रभारी श्री.विजय चौधरी यांनी उपस्थित जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनां बुथ सशक्तीकरण संदर्भात मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील स्थिती जाणून घेतली.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह राष्ट्रीय सह संघटन मंत्री श्री.शिवप्रकाशजी, प्रदेश संघटन मंत्री श्री.रवीजी अनाजपुरे, जिल्हा प्रभारी श्री.विजय चौधरी, जनजातिय मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री.किशोर काळकर, भा.ज.पा जिल्हाध्यक्ष आ.श्री.सुरेश (राजुमामा) भोळे, खासदार श्री.उन्मेष पाटील, आमदार श्री.मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, श्री.सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, श्री.पोपट तात्या भोळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, श्री.सचिन पानपाटील, श्री.मधुकर काटे, महानगराध्यक्ष श्री.दिपक सूर्यवंशी, श्री.विशाल त्रिपाठी, श्री.राधेश्याम चौधरी, श्री.राजू घुगे पाटील तसेच तालुकाध्यक्ष भाजप जिल्हा व तालुका पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.