Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे बंदुकीच्या धाकाने व्यापाऱ्यास लुटण्याचा प्रयत्न .




 भुसावळ येथील बाजारपेठ भागात होलसेल किराणा मालाच्या दुकानदारास बंदुकीचा धाक दाखवुन लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे .
 याबाबत माहिती अशी की भुसावळ येथील गणेश ट्रेडर्सचे मालक मोहनलाल चावरिया हे रात्री दुकान बंद करून शटर च्या पाया पडत असतांना   दोन अज्ञात तरुण मास्क लावून पल्सर मोटर सायकल येऊन त्यांनी मोहनलाल यांच्या पाठीला बंदूक लावून बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला . परंतु बॅग त्यांच्या हातात न आल्याने त्यांनी त्यांच्या गळ्यातील चैन ओढून पोबारा  केला परंतु चैन सुद्धा त्यांना पूर्ण मिळाली नसून अर्धीच त्यांच्या हातात आली .  सदर घटनेची पोलीस स्टेशनला माहिती मिळताच बाजार पेठ पोलीस स्टेशनचे या गजानन पडघन आपल्या स्टाफ सह घटनास्थळी पोहचले . त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला असून वर्णनावरून लवकरच आरोपीस अटक करण्यात येणार आहे असे डी वाय . एस पी  सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले . या घटनेने . व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण असून आरोपी मुजोर होत असल्याचे दिसून येत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.