Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे खंडणी मागणाऱ्या संशयितास जळगाव एल सी बी कडून अटक

भुसावळ येथे मंगळवारी दिड वाजेच्या सुमारास व्यापाऱ्यांना खंडणी मागण्याचा प्रकार  उघडकीस आला होता . या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशन तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनला असे दोन गुन्हे दाखल झाले होते .
या संदर्भात जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलिस अधिकारी किसन नजन पाटील व त्यांच्या पथकाने या प्रकरणातील आरोपी योगेश उर्फ सोनु हिरालाल मोघे ,वय २८ यास जळगाव येथील खोटे नगर मधून अटक केली आहे .
पुढील कारवाई साठी त्यास भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे .
     भुसावळात यापूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीचा हा भाऊ असून त्याने व त्याच्या साथीदाराने भुसावळ येथे गुजरात स्वीट मार्ट चे कपिल शर्मा  व गोपी मॉलचे संचालक रमेश शेठ यांना अनुक्रमे दहा व वीस हजाराच्या खंडणीची मागणी केली होती . दोन्ही व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवुन शहर व बाजार पेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यास गेले होते .या अनुषंगाने सदर संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे .आरोपी भुसावळ येथील आगवाल  चाळ . येथीलरहिवासी असून तो सध्या नाशिक येथे राहत असल्याचे समजते .
या प्रकरणात आमदार संजय सावकारे व राजू मामा भोळे यांनी पोलिसांना गुन्हेगारांना त्वरित अटक करून कारवाईच्या सूचना केल्या होत्या .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.