Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळात घरफोडीचे सत्र सुरूच ,शांतीनगर मध्ये डॉक्टरांच्या घरातील पाच लाखाचा ऐवज लंपास


भुसावळ येथे घरफोडीचे सत्र सुरूच असून येथील शांतीनगर या उच्चभूवस्तीतील डॉक्टरांच्या घरात घरफोडी करून पाच लाखाचा ऐवज लंपास झाल्याची घटना १७  मे रोजी सकाळी  दोन वाजेच्या सुमारास घडली आहे .
 याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की शांतीनगर भागातील माजी नगरसेवक प्रमोद नेमाडे यांच्या घराच्या पुढे असलेले डॉ . व्ही . ए नेमाडे हे वयोवृध्द आपल्या पत्नीसह राहतात . त्यांचे कुलर खराब असल्यामुळे पुढच्या खोलीत  झोपलेले होते . याचा फायदा घेऊन मध्यरात्री नंतर दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मागच्या खोलीच्या खिडकीचा ग्रील तोडून घरात आत प्रवेश केला व कपाट तोडून आतील अंदाजे ९ तोळे सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपये रोख घेऊन पोबारा केला आहे . या घटनेने नागरिक भयभीत झाले आहे .      याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला .असून ठसे तज्ञ व श्वान पथक यास पाचारण करण्यात आले होते . अधिक तपास पोलीस निरिक्षक गजानन पडघन करीत आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.