Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगाव फॅक्टरीत अज्ञात कारणाने मोराचा मृत्यू

वरणगांव फॅक्टरी परिसरात अज्ञात कारणाने राष्ट्रीय पक्षी मोराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे .
 याबाबत अधिक माहिती अशी की वरणगाव . आईज गेट ते फॅक्टरी मध्ये हॉस्पिटल रोड वर सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मोर लाईटच्या पोल जवळ बसलेला होता . साडेचार वाजता ड्युटी सुटल्यानंतर कर्मचारी घरी जात असताना भला मोठा मोर त्या ठिकाणी त्यांना बसलेला दिसला . कर्मचार्‍यांची चाहुल लागल्यावर मोराने उंच उडी घेऊन नंतर लगेच खाली जमिनीवर पडला असता सदर कर्मचारी त्यावेळी तेथे थांबले व त्यांनी मोर कचऱ्यात पडलेला होता  सदर कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर आणून जगवण्याचा प्रयत्न केला .परंतु मोर त्याचं ठिकाणी गत प्राण झाल्याचे समजते . सदर मोर उंच उडत असताना त्याला इलेक्ट्रिकचा तारांचा शॉक लागला असावा असे वर्तवले जात आहे . यावेळी वरणगाव फॅक्टरीतील  दिलीप ठाकूर आकाश भामरे व इतर कर्मचाऱ्यांनी फॅक्टरीच्या मेन गेटवर सुरक्षा विभागाला दूरध्वनीद्वारे सदर घटना कळवली असता सुरक्षा विभागाचे दिलीप पाटील त्यांनी गाडी पाठवली व  सदर मोर सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आला असून वन विभागाला याबाबत कळविण्यात आले आहे . वनविभाग आल्यानंतर सदर मोराचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट होणार असून वरणगांव फॅक्टरी येथील ज्या कर्मचाऱ्यांनी या कामी तत्परता  दाखविली . त्यांची प्रशंसा होत आहे . कारण मोर त्यांनी त्याच ठिकाणी सोडला असता तर कुत्र्यांनी व वन्य प्राण्यांनी राष्ट्रीय पक्षाची लचके तोडले असते .  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.