Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


रावेर येथील महिलेचा वरणगाव येथे उष्माघाताने मृत्यू ?




रावेर येथील 39 वर्षीय महिलेचा वरणगाव येथे उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे .
 याबाबत माहिती अशी की रावेर येथील रहिवासी नम्रता दिनेश चौधरी , वय ३९  या वरणगाव येथे धार्मिक कार्यासाठी आले होत्या . दुपारी स्टेशन रोडने जात असताना महात्मा गांधी विद्यालया जवळ त्यांना अचानक उलट्या झाल्या .त्यांना दवाखान्यात उपचारार्थ नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . शुक्रवारी तापमान जास्त असल्याने सदर मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे .परंतु अद्याप डॉक्टरांनी याबाबत कोणताही अहवाल दिला नसून उष्माघातानेच मृत्यू झाल्याचे परिसरात बोलले जात आहे . घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी आक्रोश केला असून . या महिलेचे वरणगाव येथे माहेर असल्याचे समजते तर त्या रावेर येथील केबल व्यवसायिक दिनेश नथू चौधरी यांच्या पत्नी असल्याचे समजते . नागरीकांना आवाहन करण्यात येते कि महत्वाच्या कामा शिवाय दुपारी बाहेर निघू नये . बाहेरील शक्य तो कामे ११ वाजेच्या आत किंवा सायंकाळी ६ वाजेनंतर करावे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.