Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


फैजपूर येथे द केरला स्टोरी चित्रपटाला गालबोट चित्रपट गृहावर दगडफेक




पूर्ण भारतभर गाजत असलेल्या देशातील वास्तविकता दाखविणारा द केरला स्टोरी या चित्रपटाच्या प्रसारासाठी वेगवेगळ्या संघटना राजकीय पक्ष प्रयत्न करत आहे . परंतु फैजपुरात हा चित्रपट सुरु असलेल्या टॉकीजवर दगडफेक झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला . श्रीराम टॉकीज मध्ये केरला स्टोरी चित्रपट सुरू असताना अचानक प्रार्थनास्थळां हुन एक जमाव त्या ठिकाणी आला . त्यांनी सरळ टाकीज वर प्रेक्षकाच्या दिशेने दगडफेक सुरू केली असल्याचा  प्रकार घडला आहे . घटना घडल्यावर काही काळ शहरातील सुभाष चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .
 . घटनेची माहिती मिळताच फैजपूर चे पी आय  सिद्धेश्र्वर आखेगावकर व पोलीस स्टाफ या ठिकाणी पोहोचून त्यांनी  दोन जणांना ताब्यात घेतले आहे . फैजपूर विभागाचे . डी वाय एस पी कुणाल सोनवणे  यांनी घटना स्थळी भेट दिली आहे . सध्या  शहरात शांतता आहे .पोलीस बंदोबस्त तैनात केला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस व सामाजिक कार्यकर्ते योग्य ती दक्षता घेत आहे . कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसां तर्फे करण्यात आले आहे . लवकरच कृत्य करणाऱ्या  समाजकंटकांना ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसां तर्फे सांगण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.