भुसावळ येथे शंभर दीडशे मॅटॅडोर चालक-मालक असून त्यातील अनेक व्यक्ती कडे जुन्या मॉडलच्या गाड्या आहे . त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह याच गाडीवर अवलंबुन आहे . सदरचे वाहन हीच त्यांची रोजी रोटी आहे . गेल्या दोन तीन वर्षा पासुन या व्यवसायावर मंदीचे सावट असुन अत्यंत दयनीय आर्थिक परिस्थितीमध्ये ते जगत आहे .
संपूर्ण व्यावसायिक कर्जबाजारी झालेले आहेत .सध्याच्या परिस्थितीत परिवार चालवणे कठीण झाले असून मुलांची शिक्षण व आर्थिक गरजा भागवणे कठीण झाले . तरीसुद्धा शासनाने जुन्या वाहनांची फिटनेस फि मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे .पूर्वी . सहाशे ते सातशे रुपयात होणारे फिटनेसच कामासाठी आता ७ हजार ते १३ हजार लागतात मुदतीत काम न केल्यास पन्नास रुपये प्रति दिवस दंड सुद्धा काढला जात आहे . आधीच व्यवसाय नाही यात परिवहन खात्याने हे वाढविलेली फि भरणे कठीण झाले आहे .
या कारणाने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली . आहे .सदरच्या कारणाने वाहन चालकाचे मनस्थिती व मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही . जनेतेचे संरक्षक असणाऱ्या लोक प्रतिनिधी यांनी याबाबत आवाज उठवावा अशी मागणी केली आहे .
शासनाकडे पूर्वी सुद्धा फि कमी करण्यासाठी संघटनांनी पाठपुरावा केला होता . परंतु शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही . सध्याच्या परिस्थितीमध्ये डिझेलचे भाव वाढ, स्पेअर पार्ट चे भाववाढ व व्यवसाय नाही या कारणाने सदर वाहन चालकांमध्ये कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे शासनाने यावर त्वरीत उपाययोजना करावी व फिटनेस की कमी करून दिलासा द्यावा अशी मागणी भुसावळ येथील जय भवानी चालक-मालक संघटना यांनी केली आहे .
निवेदनावर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ ठाकूर , केतन फालक , अनिल धबाडकर ,प्रवीण सोनार ' राजेंद्र चौधरी , रवींद्र कोळी , केवल सिंग चौधरी ( शिंदे ), कैलास महाजन ,मधुकर चौधरी , गणेश रावते , राजू ठोके , भागवत ठाकूर , नेमीचंद ठाकूर ,शशिकांत चौधरी , किशोर सूर्यवंशी , मधु भोई , गजू भाऊ , मधु भाऊ ,कालिदास सोनवणे , आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .