Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात मुबलक पाणीसाठा व पण नियोजना अभावी तालुका तहानलेला


      

भुसावळ तालुक्यात असलेल्या  महत्वाच्या हतनूर  धरणात पाणीसाठा पावसाळ्या पर्यंत पुरेल हे वारंवार पाटबंधारे अभियंता सांगतात , जिल्हाधिकारी महोदय नियमित आवर्तन सोडण्यास आदेश देतात परंतु वरणगांव . भुसावळ सह तालुक्यातील काही गावांच्या पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणा नियोजनबद्ध नसल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे याला कारण  तालुक्यातील  भुसावळ ,वरणगांव येथे प्रशासक राज आहे . नगर सेवकांचा कार्यकाल संपल्याने सर्व कारभार रामभरोसे सुरु आहे . मुख्याधिकारी ,पाणी पुरवठा अधिकारी आपल्या मर्जीप्रमाणे कार्य करित आहे . मात्र यांचा त्रास नागरीकांना भोगावा लागत आहे . पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे .
  पाणी अनमोल आहे असे नागरीकांना उपदेशाचे धडे देणाऱ्या दोन्ही नगरपरिषदेच्या परिसरात काही ठिकाणी  पाण्याची नासाडी होत आहे . तर दुसरीकडे नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने नगरपरिषद अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार संपुष्टात येण्यासाठी नागरीकांना आता निवडणूकीची प्रतिक्षा लागली आहे . परंतु निवडणूक आयोग सुद्धा निवडणूक लांबणीवर टाकत आहे . आता  ऑक्टोबर महीन्यात या निवडणूका होण्याची शक्यता आहे .
     आपल्या परिसराची जीवनदायीनी  तापी नदी पात्रात मुबलक पाणी असुनही नगर परिषदेच्या भोंगळ व नियोजन शुन्य कारभारामुळे शहरातील नागरीकांना १२ ते १३ दिवस पाण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे . परिणामी, नागरीकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करावी लागत असल्याने काही नागरीकांच्या साठवणूक केलेल्या पाण्यात जंतुचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे . तर नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील नागरीकांना पाणी अनमोल असल्याने पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करा, पाण्याची नासाडी करू नका असे उपदेशाचे डोस दिले जात आहेत .        
भुसावळ येथे पाणी पुरवठ्याच्या पाईप लाईन दुरुस्ती  साठी रेल्वेचे अधिकारी  परवानगी देत . नसतील तर सत्तेत सहभागी असलेल्या खासदार रक्षाताई खडसे यांनी अधिकार्‍यांवर अकुंश ठेवणे गरजेचे आहे . मुजोर अधिकार्‍यांना धारेवर धरणे हे लोक प्रतिनिधीचे काम आहे , कारण पाणी प्रश्न हा महत्वाचा व नागरीकांच्या जीवनाशी संबंधित विषय आहे . 
        वरणगांव येथे जलवाहिनीला लागलेली गळती त्वरीत दुरुस्त करणे, पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरीकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पाणी पुरवठा होणाऱ्या प्रभागात नियुक्त केलेल्या समिती मधील कर्मचार्‍यांना फेरफटका मारून पाण्याच्या नासाडीवर नियत्रंण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत . मात्र, नगर परिषदेच्या दिव्या खालीच अंधार असल्याने सार्वजनिक जलवाहिनी वरून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे . यामुळे पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे .
विशेष म्हणजे देशात व राज्यात सत्ता असतांना वरणगांव येथे भाजपला नगरपालीकेत ठिय्या आंदोलन करावे लागणे म्हणजेच सत्ताधारी नेतेही पाणी प्रश्नी  हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.