उष्माघाताचा कहर ,भुसावळात उष्माघाताने २९ वर्षीय युवकाचा मृत्यू .
भुसावळ परिसरात दिवसेदिवस तापमान वाढत आहे . नागरीकांना सतर्क राहण्याचे . आवाहन . आरोग्य प्रशासन करीत आहे परंतु कामासाठी बाहेर जाणे ही गरजेचे असल्याने उष्माघाताने . मृत्युच्या घटना घडतच आहे . भुसावळातील रहिवासी असलेला गिरीष शालिग्राम पाटील , वय २९ , या तरुणाचा उष्माघाताचा फटका बसल्याने सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
गिरीश हा पुणे येथे रेल्वेत नोकरीला असुन त्यास कन्या रत्न प्राप्त झाले होते . गाडेगाव, ता.जामनेर येथे सासुरवाडीला मुलीला पाहण्यासाठी रविवारी गेल्यानंतर सायंकाळी भुसावळ येथील तुकाराम नगर मध्ये घरी परतला होता . मात्र दुसर्या दिवशी सोमवार, १५ मे रोजी सकाळी त्याला अस्वस्थ वाटल्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते . उपचाराच्या दहा मिनिटातच तरुणाचा मृत्यू ओढवला.
दरम्यान गिरीषचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती डॉ.मानवतकर यांनी दिली. मयत तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा व एक नवजात मुलगी आहे. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आज मंगळवारी मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे माहीती मिळत आहे. नागरीकाना आवाहन करण्यात येते कि महत्वाचा कामाशिवाय बाहेर निघू नका . पाणी . भरपूर प्या. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सुती रुमाल नाक , कान . व डोके अच्छादित करा .