ह्या संदर्भात माहिती अशी की प्रेमराज देविदास पाटील वय ४० रा शिरपूर जिल्हा धुळे येथील रहिवासी असून हे गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथील मानवता हॉस्पीटल मध्ये कर्करोगाचा आजार वर उपचार घेत होते
*त्यांना डॉक्टरांनी 3,50,000 लाख रुपये सांगितले होते*
त्यांची परिस्तिथी हालाखीची असल्यामुळे त्यांनी दिपेश समाधान पाटील शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष चोपडा विभागीय समन्वयक ह्यांच्याशी संपर्क केला. त्या नंतर दिपेश पाटील ह्यांनी आपण मुख्यमंत्री सहायता निधी मधे अर्ज करावा असे संबंधित पेशंट ह्यांना सांगितले त्या नंतर 4/05/2023 रोजी मुख्यमंत्री सहायता निधी साठी अर्ज केला अवघ्या 12 दिवसा मधे प्रेमराज देविदास पाटील ह्या कर्करोगावर होणार खर्च भागविण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपये मंजुर करण्यात आले. त्यांचा हा निधी हॉस्पीटल प्रशासनाला सुपूर्द करण्यात आला आहे.
ह्या बद्दल पेशंट चा नातेवाईकांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, विशेष कार्यकारी अधिकारी ,मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख मंगेश चिवटे साहेब, शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष विभागीय समन्वयक चोपडा दिपेश समाधान पाटील ह्यांचे विशेष आभार मानले