Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथील तुकाराम नगर मधील सांडपाण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी मुख्याधिकारी यांना निवेदन



भुसावळ येथील तुकाराम नगर मध्ये सर्वे नंबर 101 मधील रहिवासी १९९१ पासून येथे राहत असून त्यांना अद्याप पर्यंत नगरपालिकेतर्फे सांडपाण्याचा  निचरा होण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही . सदर सांडपाण्याची गटारी तयार करून व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी रहिवाशांनी मुख्याधिकारी नगरपालिका भुसावळ यांना निवेदन दिले आहे .
निवेदनात म्हटले आहे की अनेक दिवसापासून या ठिकाणी रहिवासी असून येथील सर्व नागरीक  नगरपालिकेचे सर्व प्रकारचे कर नियमित भरत असतात तरीसुद्धा या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही .त्यामुळे रस्त्यावरच खड्डे खोदून सदरचे रहिवासी सांडपाणी सोडतात व आरोग्यास धोका निर्माण होत आहे यापूर्वी या ठिकाणी या कारणाने सुद्धा भांडणे होत असून सामाजिक सलोख्यास धोका निर्माण होऊ शकतो . तरी नगरपालिकेने या ठिकाणी सांड पाण्याची व्यवस्था त्वरीत करावी अशी मागणी केली आहे . यापूर्वी सदर रहिवाशांनी नगरसेवक बापू भाऊ महाजन ,दुर्गेशभाऊ  ठाकूर ,आमदार संजय भाऊ सावकारे यांनासुद्धा सांडपाणी व्यवस्था करण्यासाठी पत्र दिलेले आहे .
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना नगरसेवक बापू महाजन , समाजसेवक ज्ञानदेव पाचपांडे व 30 ते 40 रहिवासी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.